एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ संगणक अभियंता म्हणून काम करीत असलेला निनाद खुपच काळजीत होता. पुढील आठवड्यात त्याला संचालक मंडळासमोर सरल्या वर्षातील कामाचा आढावा व येत्या वर्षातील योजना यांच्याबद्दल एक प्रेझेंटेशन द्यायचे होते.खरं म्हणजे शाळेत किंवा महाविद्यालयीन काळात निनादने अनेक वक्तृत्वस्पर्धा गाजवल्या होत्या, हजारो लोकांसमोर तो उत्स्फूर्तपणे बोलला होतं; पण या प्रकारचे व्यावसायिक सादरीकरण त्याला नेहमीच टेन्शन द्यायचे. वक्तृत्व स्पर्धेत बरेचदा पाठांतराची मदत असायची पण इथे बरेचसे ऐनवेळच्या प्रश्नांवर अवलंबून असल्याने, आपल्याला हे सगळे जमेल ना? योग्य मुद्दे त्या त्या वेळी आठवतील ना? अश्या शंका त्याच्या मनात घर करून राहिल्या होत्या. एकेकाळी व्यासपीठे गाजवलेला हा वीर आज अगदीच गलितगात्र अवस्थेला पोहोचला होता. त्याचा आत्मविश्वासच कुठेतरी हरवून गेला होता.
निनादच्या या अवस्थेसाठी ‘लार्च’ आणि ‘हॉर्न बीम’ ही पुष्पज औषधे अगदी समर्पक होती. ‘लार्च’ गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून द्यायला मदत करते व मनाला धीर देते, तर ‘हॉर्न बीम’ एखादे उगीचच अवघड व अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची उर्मी निर्माण करून देते.
याच सोबत जर सभेला सामोरे जायची भीती वाटत असेल तर औषधाच्या मिश्रणात ‘मिम्युलस’ हे विशिष्ठ प्रकारची भीती घालवणारे पुष्पज औषधही सामील करता येईल.
वेगवेगळ्या फुलांपासून बनवलेली, अर्थातच पूर्णपणे नैसर्गिक अशी पुष्पज औषधे वापरून मनात निर्माण होणाऱ्या विविध नकारात्मक भावनांवर घरच्या घरी उपचार करता येतात. निनादच्या अवस्थेसाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे - लार्च, हॉर्न बीम आणि गरजेप्रमाणे मिम्युलस या पुष्पज औषधांचे काही थेंब रोजच्या पिण्याच्या पाण्यात मिसळून ते पाणी दिवसभर थोडे थोडे घेत राहिल्याने निनादला त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळाला, व केवळ आठवडाभरात तो आधीच्या उत्साहात व धडाडीने त्याचे प्रेझेन्टेशन देऊ शकला, याचे श्रेय डॉ एडवर्ड बॅच यांनी शोधून काढलेल्या पुष्पज औषधांनाच, नाही का !!
No comments:
Post a Comment